School Bus Accident | स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं; नायगाव येथील थरारक घटना

School Bus Accident : रस्ता ओलांडताना नेहमी सावधानी बाळगणे खूप गरजेचे असते. तसेच वाहन चालकांनीही वाहन चालवताना नेहमी सतर्क राहावे लागते. नाहीतर ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ अशी स्थिती यायला काहीच वेळ लागत नाही. वसईच्या नायगाव परिसरातही अशीच काहीशी घटना घडली आहे. दोन बहिणी रस्ता ओलांडत असताना शालेच्या बसने त्यांना चिरडले (School Bus Accident) असून या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन लहान सख्ख्या बहिणी एकमेकींचा हात पकडून अत्यंत व्यवस्थित रस्ता क्रॉस करताना दिसत आहेत. एवढ्यातच समोरुन शाळकरी मुलांनी भरलेली बस येते आणि त्यांच्या अंगावरुन जाते. हा प्रकार घडल्याचे पाहून लगेचच आजूबाजूचे लोक त्या मुलींना वाचवण्यासाठी धाव घेतात. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगाला काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली आहे. दोघींवर रुग्णालयात उचारासाठी नेण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’