Anant Radhika Pre Wedding | ‘जेव्हा मी अनंतला पाहतो तेव्हा मला माझे वडील धीरूभाई आठवतात’, मुकेश अंबानी झाले भावूक

Anant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी जामनगरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन होत आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांचा मुलगा अनंतचे खूप कौतुक केले आहे. मुकेश अंबानी भावूकपणे म्हणाले की, जेव्हा मी अनंतकडे पाहतो तेव्हा मला त्यात माझे वडील धीरूभाई दिसतात.

वडील धीरूभाई अंबानी यांची आठवण झाली
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, आज अनंत आणि राधिका नव्या (Anant Radhika Pre Wedding) आयुष्याला सुरुवात करत आहेत. आज माझे वडील धीरूभाई आम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देत आहेत. मला खात्री आहे की आज ते खूप आनंदी असतील कारण आपण त्यांचा लाडका नातू अनंतच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण साजरा करत आहोत.

जामनगरच्या विकासात धीरूभाईंचे मोलाचे योगदान आहे
मुकेश अंबानी म्हणाले, जामनगर हे माझ्या वडिलांसाठी आणि माझ्यासाठी कर्माचे ठिकाण आहे, जिथे आम्हाला आमचे ध्येय, आवड आणि उद्देश सापडला. तीस वर्षांपूर्वी जामनगर ही ओसाड जमीन होती, पण आज तुम्ही येथे जे पाहता ते धीरूभाईंचे स्वप्न साकार झाले आहे.

मुकेश अंबानींनी अनंतची तुलना धीरूभाईंशी केली
मुकेश अंबानी म्हणाले की, संस्कृतमध्ये अनंत म्हणजे ज्याला अंत नाही. मला अनंतात अनंत शक्ती दिसते. मी जेव्हा जेव्हा अनंतकडे पाहतो तेव्हा मला त्यात माझे वडील धीरूभाई दिसतात. अनंतचीही माझ्या वडिलांसारखीच वृत्ती आहे की काहीही अशक्य नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’