लग्नाची पहिली पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तिघांचा अपघातात मृत्यू

पुणे – आपल्या लग्नाची पहिली पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट-गाणगापूर (Akkalkot-Gangapur) रस्त्यावर घडली. तीनही मृत तरुण पुण्यातील हिंजवडी व मारूंजी (Hinjawadi and Marunji) परिसरातील आहेत. या दुर्घटनेमुळे हिंजवडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

दीपक सुभाष बुचडे (Deepak Subhash Buchade) (वय-२९, रा. मारूंजी), आकाश ज्ञानेश्वर साखरे (Akash Dnyaneshwar Sakhare) (वय-२८, रा. हिंजवडी), आशुतोष संतोष माने (Ashutosh Santosh Mane) (वय-२३, रा. हिंजवडी) अशी या अपघातात मृत (Dead in an accident) झालेल्या तरूणांची नावे आहेत. यापैकी दीपकचा येत्या १८ जूनला विवाह होणार होता. त्यासाठी देवदर्शन करून देवासमोर पत्रिका ठेवण्यासाठी हे तिघे बुधवारी सकाळी मोटारीने तिकडे गेले होते. तुळजापूर, गाणगापूर व अक्कलकोटला ते जाणार होते.

तुळजापूरच्या मंदिरात (Temple of Tuljapur) पत्रिका ठेवल्यानंतर ते पुढे गाणगापूरला निघाले होते. रात्री नऊच्या सुमारास दीपकने तसे घरी फोन करून सांगितले होते. दुर्देवाने रात्री साडेअकराच्या सुमारास काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची मोटार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला व त्यातच तिघांचा मृत्यू झाला.