राज्यातील आजच्या ‘या’ आहेत मोठ्या राजकीय घडामोडी! वाचा एका क्लिकवर

मुंबई : शिवसेना भवनात खासदार संजय राऊत यांची ४ वाजता पत्रकार परिषद होण्यापूर्वीच इडीने मुंबईतील १० ठिकाणांवर छापे टाकण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आज चांगलचं तापलेलं दिसून येणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मुंबईतील एका व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

इडी कडून कारवाई होत असलेल्या व्यक्तीचा नाव अद्यापही समोर आलेलं नाही आहे. परंतु त्या व्यक्तीचा संबंध दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे बोलण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर इडीने मागच्याच आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता त्या व्यक्तीवर इडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणातून इडीच्या हाती काय लागतं. त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर बोलण्याचं टाळलं आहे. ज्या वेळी देशाच्या सुरक्षितेचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यावेळी राज्याने देखील सहकार्य करणे आवश्यक आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्यांना देखील ठाकरे सरकार विरूद्ध आझाद मैदानावरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. तर संजय राऊत हे आजच्या पत्रकार परिषद मधून काय धमका करणार, याकडे लक्ष लागून आहे.