कॉंग्रेसची भूमिका उचित नाही; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं सुचक वक्तव्य

मुंबई : मागील दोन ते तीन आठवड्यापासून राज्यात विविध मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. कॉंग्रेस पक्ष भाजपच्या आमदार, खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. तर संजय राऊत हे वारंवार भाजपवर निशाणा साधत आहे. अशातच किरीट सोमय्या देखील महाविकास आघाडीवर तक्रार दाखल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात नेत्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

कॉंग्रेसच्या भाजप कार्यकर्त्यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याच्या मुद्द्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणे हे उचित ठरणार नाही. सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे. सगळ्या पक्षांनी संयम बाळगला पाहिजे. जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रत्येक नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकांनी आपापली भूमिका बदलली पाहिजे.

तसेच १९ फेब्रुवारी रोजी राज्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर त्यांनी शिवप्रेमींना नियमावलीचं पण पालन करत शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन देखील केलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने जी पुतळा उभारण्यासंदर्भात जी नियमावली घालून दिली आहे. त्या नियमावलीचं पालन केल्यानंतर कुणालाही पुतळा उभारण्यात काही अडचण येणार नाही. मात्र याबाबत शेवटचा निर्णय जिल्हाधिकारांच्या हातात असतो. मात्र जाणूनबुजून परवानगी न घेता त्याठिकाणी अस्वस्थता निर्माण करण्याचं काम करत आहे. त्यांनी राज्य सरकार आणि जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली पाहिजे. त्यानंतर पुतळा उभारल्यानंतर त्याची सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे. यावरून लोकांनामध्ये मतभेद होतो. त्याचा तोटा सगळ्या समाजाला भोगावं लागतं.