स्मार्टफोन घ्या अन् २ किलो टोमॅटो मोफत मिळवा; मोबाईल दुकानदाराची गजब ऑफर

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर टोमॅटोचा भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. दरम्यान मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शहरातील अभिषेक मोबाईल शॉपीतील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही अनोखी ऑफर काढली आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटर अभिषेक यांनी स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर आणली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला, असे अभिषेक यांनी सांगितले आहे.