“गेल्या २५ वर्षांपासून काम मिळालं नाही म्हणून…”, उर्फी जावेदचा ‘गदर’ फेम अमिषा पटेलशी पंगा

Uorfi Javed Slam Ameesha Patel: अमिषा पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अमिषा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडताना दिसत आहे. अमिषा व्हिडिओमध्ये अॅडल्ट कंटेंटबद्दल बोलत आहे. त्याचबरोबर ती लेस्बियन विषयाशी संबंधित  आपले मत मांडले आहे. यावर टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने प्रतिक्रिया दिली आहे.

अमिषा पटेलची एक जुनी व्हिडिओ मुलाखत आहे ज्यामध्ये ती म्हणताना दिसतेय की, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म अपमानास्पद भाषेने भरलेले आहे. होमोसेक्शुएलिटी, गेज, लेस्बियनेजम, असे काही सीनही येतात जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांचे डोळे झाकावे लागतात. तुमची मुलं त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचू नयेत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या मुलांपर्यंत पोहोचू नयेत असे तुम्हाला वाटते.’ अमिषाच्या या बोलण्यावर उर्फी जावेदने खडतर प्रश्न विचारला आहे.

जेव्हा उर्फी जावेदने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिला, तेव्हा तिने तो आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला. उर्फी जावेदने अमिषा पटेलला प्रश्न केला की, ‘हे समलिंगी आणि समलैंगिकता काय आहे? मुलांना त्यापासून दूर ठेवायचे? म्हणजे जेव्हा ती कहो ना प्यार है म्हणते तेव्हा ते फक्त सरळ लोकांसाठी असते का? एवढ्या संवेदनशील विषयावर अभ्यास न करता एक सार्वजनिक व्यक्ती स्वतः असे कसे बोलू शकते? हे मला खूप दुःखी करत आहे.’

उर्फी एवढ्यावरच थांबली नाही. ती पुढे अमिषा पटेलला म्हणाली, ‘तिला 25 वर्षांपासून काम मिळाले नाही, त्यामुळे तिच्यामध्ये खूप कटुता निर्माण झाली आहे.’