केवळ ५०० रुपयांसाठी लीक झालेला शाहिद-करीनाचा किसींग फोटो, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Shahid Kapoor On Kareena Kapoor Kiss: करीना कपूर आणि शाहिद कपूर 2004 मध्ये एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. एकदा या दोघांचा नाईट क्लबमधील एक व्हिडिओ लीक झाला होता. यामध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. यानंतर बराच वाद झाला होता. आता बऱ्याच वर्षांनी शाहिद या घटनेबद्दल बोलला आहे.

शाहिद कपूरने मिड डेला मुलाखत दिली आहे. यामध्ये तो उघडपणे बोलला आहे. शाहिद म्हणाला, “त्यावेळी मी पूर्णपणे तुटलो होतो. तेव्हा मी 24 वर्षांचा मुलगा होतो आणि जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मला असे वाटले की कोणीतरी माझी प्रायव्हसी हिसकावून घेतली आहे आणि मी तिचे संरक्षण करण्यासाठी काहीही करू शकलो नाही.”

“हे काय घडत आहे आणि हे असे का होत आहे याबद्दल मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. त्या वयात मी खूप अस्वस्थ झालो होतो. मी माझ्या भावनांना आवर घालू शकत नव्हतो. मी एका मुलीला डेट करत होतो. मुलीसोबत कसे राहायचे ते मला कळत नव्हते. पण हळूहळू मला समजले की आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो आहोत आणि आम्ही कलाकारही आहोत. असे घडत राहाते.”

फोटो कसा लीक झाला याबद्दल शाहिदला सांगण्यात आले की, ‘आमच्या स्टुडिओत दोन मुले आली आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही 500 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला शाहीद आणि करीनाचा क्लबमध्ये किस करतानाचा फोटो देऊ.