मंदिराच्या जागेसाठी लढा उभारण्याची भाषा करणारे, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या आंदोलनावेळी कुठे लपुन बसले होते ?

Pune – देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर (Punyeshwar) आणि नारायणेश्‍वर ( narayaneshwar) मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. या मंदिराच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारले आहेत. ज्ञान व्यापी प्रमाणे लवकरच या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde, General Secretary of Maharashtra Navnirman Sena) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Social worker Trupti Desai) यांनी मनसेला लक्ष्य केले आहे. त्या म्हणाल्या, मंदिराच्या जागेसाठी लढा उभारण्याची भाषा करणारे, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या आंदोलनावेळी कुठे लपुन बसले होते. ईश्वर आणि अल्लाह एकच आहे, फक्त वेगवेगळी रूपे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे देव आहेत. आता दर्ग्याच्या जागी मंदिरे होती यासंदर्भात आधीच न्यायालयात खटले सुरू आहेत, न्यायालय योग्य निकाल देईलच.

याबाबतीत लढा उभारण्यासाठी बोलणारे महिलांना मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात आम्ही लढा देत असताना कुठे लपून बसले होते?… मला वाटते त्या ठिकाणी मंदिर असो वा दर्गा हे श्रद्धेचे स्थान आहे. तिथे धर्मा- धर्मातली भांडणे दाखविण्यापेक्षा ही जागा देवासाठी आरक्षित आहे, मग कोणत्याही धर्मातील देव असो याचे समाधान आपल्याला असले पाहिजे.असं त्या म्हणाल्या आहेत.

मनसेचा नेमका दावा काय ?

अल्लाउद्दीन खिलजीचा (Allauddin Khilji) एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर (Temple of Lord Shiva) उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर (Punyeshwar and Narayaneshwar)  ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.