शिंदे गटातील अत्यंत महत्वाच्या नेत्याला उद्धव ठाकरे घेरण्याच्या तयारीत ?

मुंबई – शिंदे गटाचे (Shinde Faction) आमदार आणि शिवसेनेचे (Shivsena) विधिमंडळ मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक असलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता या नेत्या शिवबंधन बांधणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  स्नेहल जगताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

स्नेहल जगताप या कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक मानल्या जातात. त्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. महाडमधील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी त्या एक आहेत. स्नेहल जगताप यांना चार ते पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं बाोलले जात आहे. अखेर जगताप-ठाकरेंची भेट झाल्याची माहिती आहे. स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.