Vasant More | मला पुण्यातून महाविकास आघाडीकडून संधी मिळेल, वसंत मोरे यांनी व्यक्त केली खात्री

मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडीकडून पुण्यातून आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरे (Vasant More) म्हणाले, मला महाविकास आघाडीकडून संधी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि पुणेकरांच्या भल्यासाठी माझा मविआ विचार करेल, याची मला खात्री आहे. जो पक्ष पुण्यात विजयी होईल आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करेल, त्या पक्षासोबत मी कायम असेल. तर मविआतील तिनही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत, त्यामुळे मला जो निर्णय घ्यायचा आहे तो पुण्याच्या दृष्टीने घेईल, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडीचा लोकसभेत विजय होईल, असा अंदाजही वसंत मोरे यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका