तृप्ती देसाईंनी केली आदिपुरुषची स्तुती म्हणाल्या, सोशल मिडीयात मुद्दाम…

Pune – ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush directed by Om Raut) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अगदी राजकीय वर्तुळातूनही या चित्रपटावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, एकाबाजूला या सिनेमाचा विरोध वाढत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मात्र या सिनेमाला पाठींबा दिला आहे. त्या म्हणाल्या, आदिपुरुष (Adipurush ) चित्रपटातील सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे तसेच स्टोरी ही खूप चांगली आहे. चित्रपट कुठेही बोर होत नाही तसेच वेगवेगळे प्रसंग थोडक्यात दाखवल्यामुळे बघायला अजून इंटरेस्ट वाढतो.

सोशल मीडियात या चित्रपटाची बदनामी ऐकल्यामुळे नेमका चित्रपट कसा असेल ?असे वाटले होते ,परंतु आत्ता समजले की सोशल मीडियात मुद्दाम चांगल्या गोष्टीनांही पूर्णपणे बदनाम केले जाते. शेवटी चित्रपट आहे काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवले गेले असते विरोध करण्यासारखे काही नाही., काही डायलॉग जे लोकांना आवडलेले नाहीत त्यात बदल करण्याचा शब्दही निर्मात्यांनी दिला आहे. पैसा वसूल चित्रपट आहे ,ज्यांनी कुणी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहावा,मुलांना सुद्धा दाखवावा.