Pravin Tarde | मुरलीधर मोहोळचं वय पाहता पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला

Pravin Tarde | येत्या लोकसभा निवडणूक २०२४ साठी पुणे भाजपातून बरीच नावे चर्चेत होती. त्यांपैकी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लोकसभा उमेदवारी मिळाल्याने मुरलीधर मोहोळ यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुरलीधर मोहोळांचं वय पाहता, पुण्याला पुढील २५ वर्षे खंबीर नेतृत्त्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला असे गौरवोद्गार प्रवीण तरडे (Pravin Tarde)  यांनी काढले आहेत.

सांस्कृतिक पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही प्रत्येक पुणेकराची ईच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडलं आहे. मुरलीधर मोहोळ ही प्रत्येक पुणेकराची पहिली पसंती असेल यात शंका नाही. कारण पुण्याचा महापौर असताना आमच्या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्ख पुणे शहर जपलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार