दुर्देवी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Mumbai: हल्ली हृदयविकाराच्या झटक्यामुळे बऱ्याचशा प्रसिद्ध कलाकारांचे अकनाक निधन झाले आहे. आता टीव्ही अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) याचीही वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Pawan Singh Dies Due To Heart Attack) प्राणज्योत मालवली आहे. १८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता मुंबईतील राहत्या घरी त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवनच्या आकस्मिक निधनाने कुटुंबासह चाहत्यांना आणि दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

कन्नड अभिनेता पवन सिंह  हा कर्नाटकातील मंड्या येथील रहिवासी होता. तिथेच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पवन कामानिमित्त बराच काळ कुटुंबासोबत मुंबईत राहत होता. साऊथशिवाय त्याने हिंदी टीव्ही शोमध्येही काम केले होते. त्याच्या पालकाचे नाव नागराजू आणि सरस्वती आहे.