काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावं, उद्धव ठाकरेंची पत्राद्वारे मागणी

Uddhav Thackeray Invites President Draupadi Murmu:- जानेवारी २२, रोजी अयोध्या येथील राम मंदिरात भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच देशातील नामांकित लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. राम मंदिराच्या लोकर्पण सोहळ्यावेळी आपण नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिरात येण्याचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “२२ जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्री राम मंदिराचं दर्शन घेत गोदावरी तीरी आरती करणार आहोत. २३ जानेवारीला शिवसेनेचं शिबीर आणि जाहीर सभा होणार आहे.”

“अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्यावरती बाबरी मशिद बांधण्यात आली होती. तसेच, सोमनाथाच्या मंदिराचं अनेकवेळा विध्वंस करण्यात आला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन सोमनाथाच्या मंदिराचं पुर्ननिर्माण केलं. मात्र, सोमनाथ मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापण सोहळ्याला वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं होतं. तेव्हा सोमनाथ मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापण सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापणा झाली होती,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“वर्षानुवर्षे प्रभू श्री राम मंदिरासाठी चाललेल्या लढ्याला अंतिमत: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. श्री राम प्राण प्रतिष्ठापण सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण द्यावं आणि प्राण प्रतिष्ठापणा त्यांच्या हस्ते व्हावी. केंद्र सरकार राष्ट्रपतींना आमंत्रण देईल का माहिती नाही. पण, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’