3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

Assam Govt Scheme: आसाम सरकारने ग्रामीण महिला उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य योजनेत काही नवीन अटी लागू केल्या आहेत. यामध्ये एका महिलेला किती मुले असू शकतात यावर मर्यादा घालण्यात आली आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांना कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, त्यांना तीनपेक्षा जास्त मुले नसावीत, तर अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनुसूचित जाती (एससी) महिलांसाठी ही मर्यादा चार मुलांपर्यंत आहे.गुरुवारी (11 जानेवारी) मुख्यमंत्री महिला उद्योजकता अभियान (MMUA) ची घोषणा करताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की राज्य सरकारच्या सर्व लाभार्थी योजनांमध्ये हळूहळू असे लोकसंख्येचे निकष लागू केले जातील. हा निर्णय 2021 मधील त्यांच्या घोषणेशी सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, एमएमयूए योजनेचे निकष काही काळासाठी शिथिल करण्यात आले असून एसटी दर्जाची मागणी करणाऱ्या मोरान, मोटोक आणि  अन्य काही जमातींवर चार मुलांची मर्यादा घालण्यात आली आहे, असे ते म्हणाले. या योजनेचा उद्देश ग्रामीण स्वयं-सहायता गटांमध्ये सहभागी असलेल्या महिलांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजक म्हणून विकसित करण्यास मदत करणे आहे.

सरमा म्हणाले की, ही योजना मुलांच्या संख्येशी जोडली गेली आहे जेणेकरून महिलांना त्यांचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी पैसा वापरता येईल. एका महिलेला चार मुलं असतील तर तिला पैसे खर्च करायला कुठे वेळ मिळणार, व्यवसाय करायला वेळ कुठून मिळणार, असंही ते म्हणाले. ती मुलांच्या शिक्षणात व्यस्त असेल.या अटी देखील पूर्ण कराव्या लागतील

मुलांच्या संख्येच्या मर्यादेव्यतिरिक्त, लाभार्थ्यांना इतर दोन अटी देखील पूर्ण कराव्या लागतील. मुली असतील तर त्यांना शाळेत दाखल करावे लागते. जर मुलगी शालेय वयाची नसेल, तर महिलांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केली पाहिजे की वेळ आल्यावर तिला शाळेत दाखल केले जाईल. तसेच शासनाच्या वृक्षारोपण अभियान, अमृत वृक्षारोपण आंदोलनांतर्गत त्यांनी गेल्या वर्षी लावलेली झाडे जगवावी लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चिंता करू नका ! तुमचा जन्म फौजदार होण्यासाठी झालाय; संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव

माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’