Ujani Reservoir | उजनी जलाशयात पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम ३ मार्च रोजी

Ujani Reservoir : वाइल्डलाइफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी (WRCS) आणि सोलापूर वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम वार्षिक आशियाई वॉटरबर्ड सेन्सस (AWC) अंतर्गत ३ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

उजनी जलाशय (Ujani Reservoir) हा तेथील वैविध्यपूर्ण पक्षीजीवनासाठी प्रसिद्ध आहे. बदके,करकोचे, पाणकोंबड्या, वेडर्स यासह ३०० हून अधिक प्रजाती इथे आढळतात. हा महत्त्वपूर्ण जलाशय, स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना निवारा व मुक्कामासाठी उपयुक्त आहे.

उजनी जलपक्षी गणना हा एक नागरिक-विज्ञान उपक्रम आहे. या जलपक्षी गणनेद्वारे जलपक्ष्यांची संख्या व त्यांचा विस्तार याबद्दल उपयुक्त माहिती मिळून जलपक्ष्यांच्या संवर्धनाला व त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संरक्षण व व्यवस्थापनाला मदत होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

इच्छुक पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी यांनी ‘डब्ल्यूआरसीएस’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला गुगल फॉर्म २८ फेब्रुवारी पर्यंत भरून जलपक्षी गणनेसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही विभागीय वन अधिकारी (प्रसिद्धी व माहिती, वने) आशा भोंग यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही