जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही

Ajit Pawar: सत्तेत जाऊन देखील जनता प्रतिसाद देत नाही या जाणिवेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिले.

राजकारणात आल्यानंतर खासदार,आमदार, मंत्री, अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद हे सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे मिळालं हे पत्रामध्ये लिहिण्याचं धाडस अजितदादा दाखवू शकले नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे मुख्य प्रवक्ते महेश (Mahesh Tapase) तपासे यांनी केली.

जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी हे त्यांचं वाक्य पूर्ण पणे चुकीच आहे. हे वाक्य जर खरं असतं तर ८४ च्या निवडणुकीत भाजपमधून निवडून आलेले दोन खासदारएके पटेल व जंगा रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलं असतं आणि तुम्ही लिहिलेला डायलॉग मारला असता. परंतु तसं झालं नाही आणि देशभरात आजही अनेक लहान-मोठे पक्ष विरोधामध्ये कार्यरत आहेत याची आठवण महेश तपासे यांनी करून दिली.

आपण सत्तेमध्ये जनतेच्या भल्यासाठी सामील झालो हे अगदी महाराष्ट्राला न पटणार कारण तुम्ही दिलं. संविधान रक्षणाचे जे संघर्षमय कर्तव्य पवार पार पडत आहेत अशा वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहिला हवे होत, अगदी हे कर्तव्य देखील तुम्ही विसरलात असेही तपासे पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार