नाशिकमधून संजय राऊत माघारी फिरताच राजकीय भूकंप, शिंदे गटात १२ मातब्बर नेत्यांचा प्रवेश

नाशिक – नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला (Thackeray gat) मोठे खिंडार पडले असून तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde sena) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईला माघारी फिरताच इकडे ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर. डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे, आणि मनसेचे सचिन भोसले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.संजय राऊत यांनी पंधरा दिवसाच्या अंतरावर दोनदा नाशिक दौरा करूनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेले नाही.

दरम्यान राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर नाशिकमधून पहिल्यांदाच शिंदे गटात हा प्रवेश सोहळा झाल्यानं शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.विशेष म्हणजे संजय राऊत यांनी नाशिक दौ-यावर आल्यानंतर नाराज पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या वन टू वन मुलाखती घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यश आले नाही.