दिल्लीश्वरांनी पुन्हा एकदा मातब्बर मराठी नेत्याचे पंख छाटले; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली खंत 

मुंबई – काल राज्याच्या राजकारणाने एक नवे वळण घेतले अआहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान,  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता. पण थोड्यात वेळात शिंदेंना मुख्यमंत्री बनवून सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले असलेल्या फडणवीसांनी (Devendra Fadanvis) वरिष्ठांच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सर्वात मोठा धक्का होता.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर दिल्लीश्वरांनी पुन्हा एकदा मातब्बर मराठी नेत्याचे पंख छाटले अशी प्रतिक्रिया NCP प्रवक्ता उमेश पाटील (Umesh Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  नुतन मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून,मोदी -शहा (Modi-Shah) जोडीने महाराष्ट्राला भविष्यात पंतप्रधान पद मिळू नये याची तजवीज केली असावी.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,त्यांच्या हुशारीच्या व मुत्सद्दीपणाच्या जोरावर भविष्यात पंतप्रधान (Prime Minister) पदाचे दावेदार होण्याची दाट शक्यता होती.त्यांना वेळीच रोखण्यासाठी मोदी – शहांनी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले असावेत.विरोधी पक्षाचा का असेना परंतु मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा असे एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला वाटते.स्व.यशवंतराव चव्हाण,शरद पवार, नितीन गडकरी यांच्या नंतर देशाचे नेतृत्व करण्याची गुणवत्ता व क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात नक्कीच आहे.परंतु महाराष्ट्रातील सक्षम लोकनेत्यांचा आकस राष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय आहे.भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी आत्तापासूनच ती काळजी घेतल्याचे दिसत आहे.