Nora Fatehi | पापाराझींवर भडकली नोरा फतेही; म्हणाली, ‘ते फक्त अभिनेत्रींच्या प्राइव्हेट पार्ट्सवर झूम करतात’

Nora Fatehi On Paparazzi  प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने आता खूप बोल्ड आणि वादग्रस्त विधान केले असून पापाराझींना फटकारले आहे. नोरा फतेहीने आता मीडियाला दिलेल्या मुलाखतीत या पॅप्सचा पर्दाफाश केला आहे. आजकाल तुमच्या लक्षात आले असेल की पापाराझी अभिनेत्रींना चुकीच्या पद्धतीने कॅमेरात कैद करत आहेत. व्हिडिओ बोल्ड दिसण्यासाठी ते अशा अँगलमधून शूट करतात की ते पाहून अभिनेत्री स्वतःही अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत आता नोराने यावर मोठे वक्तव्य केले आहे.

प्रायव्हेट पार्ट्सवर फोकस केल्याने नोराला राग आला
नोरा (Nora Fatehi) म्हणाली की, तिला असे वाटते की पापाराझींनी तिच्यासारखे नितंब पाहिले नाहीत. ते केवळ तिच्यासोबतच नाही तर इतर महिला अभिनेत्रींसोबतही असेच कृत्य करतात. ते विनाकारण नितंबांवर झूम करतात. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना कदाचित ते रोमांचक वाटणार नाही. पापाराझी विनाकारण प्रायव्हेट पार्टवर लक्ष केंद्रित करत आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. आता या अभिनेत्रीच्या या विधानाने चांगलीच चर्चा रंगली आहे. बरं, ही पहिलीच वेळ नाही आहे की एखाद्या अभिनेत्रीने समोर येऊन अशा प्रकारे पापाराझींवर आपला राग व्यक्त केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका