Ajit Pawar | ‘साहेबां’च्या विरोधानंतर राेहित पवारांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती; अजित पवारांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोहित पवार हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधत आहेत. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

२०१७ मध्ये राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी रोहित पवार यांना उमेदवारी देण्याची आपल्याकडे मागणी केली. पण ‘साहेबां’नी त्याला विरोध केल्यावर राेहित पवार यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली. मात्र, आपण साहेबांचे न एकता रोहित पवारांना उमेदवारी दिली. निवडून आल्यावर मलाच साहेबांची बोलणी खावी लागली. त्यानंतर राेहित पवार यांनी हडपसरला विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तेथील राजकीय गणिते पाहता आपणच कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्यास सुचविल्याचा दावा अजित पवार यांनी यावेळी करीत आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला