Shivajirao Adhalarao Patil | ही निवडणूक गावकी भावकीची नाही, तर देशाचा नेता ठरवण्याची आहे; शिवाजीदादा काय म्हणाले?

Shivajirao Adhalarao Patil | शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे नारायणगावच्या दौऱ्यावर असताना येथील गावकऱ्यांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. तसेच शिवजन्मभूमीचा पुत्र म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी जाहीर पाठिंबा दिला. यावरून जेव्हा आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) नारायणगावमध्ये गेले तेव्हा आढळरावांनी गावकऱ्यांना चिमटा काढला.

कोणतीही निवडणूक म्हटल की ती गावकी – भावकी भोवती फिरत असते, मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा अन्य पातळ्यांवर होऊ नये यासाठी काही नेते आग्रही आहे. निवडून येण्याच्या मेरिटवर जसे तिकीट मिळत आहे तसेच काम करण्याची क्षमता ओळखून मतदान करण्याचे आवाहन करताना नेते दिसत आहेत. यातूनच लोकसभेची ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

आढळराव पाटील म्हणाले, ही निवडणूक गावकी भावकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान देशाचा नेता ठरवण्याची आहे.  आगामी पाच वर्षाच्या काळात देशाचा नेता हा जागतिक पातळीवर आपल्या देशाला कुठे नेऊन ठेवतो. आपली अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकांवर येईल हा विचार करण्याची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले