State Minister Ramdas Athawale | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची हॅटट्रिक

State Minister Ramdas Athawale | लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांनी भारताला नवे सरकार मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. अमित शहा शपथ घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. 2019 मध्येही शपथ घेण्याचा क्रम असाच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात ज्या २० चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता ते यापुढे मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये मित्रपक्षांचाही सहभाग आहे कारण यावेळी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीए आघाडीत अनेक पक्षांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपचे २० चेहरे आहेत ज्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, मात्र यावेळी त्यांची नावे यादीतून गायब आहेत. या सर्वांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (State Minister Ramdas Athawale) यांनी आज दि.9 जून 2024 रोजी केंद्रिय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा भारत सरकार मध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदाचा बहुमान मिळविणारे ना.रामदास आठवले यांचे देशभर आंबेडकरी रिपब्लिकन दलित बौध्द बहुजन जनतेतून कौतुक होत आहे.केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक करणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यावर जगभरातून त्यांच्या चाहत्यांचा शुभेच्छा वर्षाव होत आहे.

असे आहे केंद्रीय मंत्रिमंडळ

नरेंद्र मोदी – पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

१. राजनाथ सिंह – भाजप

२. अमित शाह – भाजप

३. नितीन गडकरी – भाजप

४. जगतप्रकाश नड्डा – भाजप

५. शिवराजसिंह चौहान – भाजप

६. निर्मला सीतारामन – भाजप

७. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर – भाजप

८. मनोहर लाल – भाजप

९. एच. डी. देवेगौडा – जेडीएस

१०. पियूष गोयल – भाजप

११. धर्मेंद्र प्रधान – भाजप

१२. जितनराम मांझी – हम

१३. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – जदयु

१४. सर्वानंद सोनोवाल – भाजप

१५. डॉ. वीरेंद्र कुमार – भाजप

१६. किंजरापुर राममोहन नायडू – तेलुगू देशम

१७. प्रल्हाद जोशी – भाजप

१८. जुएल ओराम – भाजप

१९. गिरीराज सिंह – भाजप

२०. अश्विनी वैष्णव – भाजप

२१. ज्योतिरादित्य सिंदिया – भाजप

२२. भूपेंद्र यादव – भाजप

२३. गजेंद्रसिंह शेखावत – भाजप

२४. अन्नपूर्णा देवी – भाजप

२५. किरेन रिजिजू – भाजप

२६. हरदीप सिंग पुरी – भाजप

२७. डॉ. मनसुख मांडविया – भाजप

२८. जी. किशन रेड्डी – भाजप

२९. चिराग पासवान – लोजपा (रामविलास)

३०. सी. आर. पाटील – भाजप

राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

१. राव इंद्रजित सिंह – भाजप

२. डॉ. जितेंद्र सिंह – भाजप

३. अर्जुन राम मेघवाल – भाजप

४. प्रतापराव जाधव – शिवसेना

५. जयंत चौधरी – राष्ट्रीय लोकदल

राज्यमंत्री

१. जितिन प्रसाद – भाजप

२. श्रीपाद नाईक – भाजप

३. पंकज चौधरी – भाजप

४. रामदास आठवले – रिपाई (आठवले)

५. रामनाथ ठाकुर – जदयु

६. नित्यानंद राय – भाजप

७. अनुप्रिया पटेल – अपना दल

८. व्ही सोमन्ना – भाजप

९. डॉ. चंद्रशेखर पेम्मासनी – तेलुगू देशम

१०. प्रा. एसपी सिंह बघेल – भाजप

११. शोभा करंदलाजे – भाजप

१२. कीर्तीवर्धन सिंह – भाजप

१३. बी. एल. वर्मा – भाजप

१४. शांतनू ठाकुर – भाजप

१५. सुरेश गोपी – भाजप

१६. डॉ. एल. मुरुगन – भाजप

१७. अजय तम्टा – भाजप

१८. बंडी संजय कुमार – भाजप

१९. कमलेश पासवान – भाजप

२०. भगीरथ चौधरी – भाजप

२१. सतीशचंद्र दुबे – भाजप

२२. व्ही. संजय सेठ – भाजप

२३. रवनीत सिंग – भाजप

२४. दुर्गादास उईके – भाजप

२५. रक्षा खडसे – भाजप

२६. सुकांता मुजुमदार – भाजप

२७. सावित्री ठाकुर – भाजप

२८. तोखन साहू – भाजप

२९. राजभूषण चौधरी – व्हीआयपी

३०. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – भाजप

३१. हर्ष मल्होत्रा – भाजप

३२. निमुबेन भांबनिया – भाजप

३३. मुरलीधर मोहोळ – भाजप

३४. जॉर्ज कुरियन – भाजप

३५. पवित्र मार्गारिटा – भाजप

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!