हातात बंदूक घेऊन आला दरोडेखोर, दबंग दादा भुसे बंगल्यात घुसले अन्…

नाशिक – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. भुसे यांनी भर दुपारी एका बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला (Crime News) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ते चर्चेत आले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

मालेगाव येथील कलेक्टर पट्टा परिसर हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात दुपारच्या वेळेला येवून लूट करता येईल या उद्देशाने एक दरोडेखोर आला. या दरोडेखोराला नागरिकांनी आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता, तरीही दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी करत होता.

यावेळी जवळूनच जाणाऱ्या नाशिकच्या पालकमंत्र्यांना ही बाब कळली, त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडत पोलीसांच्या हवाली केले आहे.दादा भुसे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील 3 महिलांचा जीव वाचला आहे.  या कारणामुळे भुसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.