लबाड लांडगं ढाँग करतंय; मनसेच्या नेत्याची खोचक टीका 

मुंबई – काल अमरावतीमध्ये बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी देशातील एकंदरीत वातावरणावर भाष्य केले आहे. आज आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागत आहे. देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केले जात आहे. असं ते म्हणाले.

हिंदू – मुस्लीम (Hindu -Muslim) करता येईल का? दलित – हिंदू करता येईल का? असं सतत काही ना काही चालू आहे. ज्या समाजातील घटकांचा विश्वास आहे त्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी केव्हाही या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. जो जातीयवाद करतो जो धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करतोय अशांची संगत राष्ट्रवादी कधीही करणार नाही असा देखील दावा पवारांनी केला आहे.

दरम्यान, आता या मुद्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून  मनसेचे नेते आशिष देवधर (Aashish Deodhar)  यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, जुनं गाणं आठवलं  ‘लबाड लांडगं ढाँग करतंय’ पुण्यातील एका कार्यक्रमात ‘पुणेरी’ पगडी काढून ‘फुले’ पगडी भुजबळांच्या डोक्यावर ठेवणारे पवार. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भाजपाने खासदार नियुक्त केल्यानंतर ‘आजकाल पेशवे छत्रपती नेमतात’ अशी टिप्पणी करणारे पवार. नेहमी ‘शाहू फुले आंबेडकर’ या महापुरूषांच्या नावाने स्वत:चा विचार रूजवणारे पवार अशी किती उदाहरणं देऊ?? काल अमरावतीत केलंलं वक्तव्य हे निव्वळ हास्यास्पद आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे आहे.असं ते म्हणाले.