Orry-Urfi Video: राम मिलाई जोडी…! उर्फी जावेदला अंबानींच्या सूनेच्या मित्रासोबत पाहून चर्चांना ऊत

Orry- Urfi Video: टीव्ही अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उर्फी जावेद ‘डिस्को डान्सर- द म्युझिकल इव्हेंट’ साठी मुंबईत दाखल झाली होती, ज्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुनील शेट्टी करत होते. उर्फी जावेद या कार्यक्रमात ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीसोबत पोज देताना दिसली. ओरी (Orry) न्यासा देवगण, जान्हवी कपूरपासून सारा अली खानपर्यंत आणि अगदी अंबानी कुटुंबाची सून असलेल्या राधिका मर्चंटपर्यंत सर्वांचा चांगला मित्र आहे. अशात आता उर्फीसोबतही दिसल्याने त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘डिस्को डान्सर – द म्युझिकल इव्हेंट’मध्ये उर्फी जावेद ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. या ड्रेससोबत तिने डोक्यावर मुकुट आणि गळ्यात सरड्याचा हार घातला होता. उर्फीचा लूक पाहून पापाराझींनी तिचे कौतुक केले. यादरम्यान ओरीने उर्फीसोबत मस्तीही केली आणि तिला ‘छिपकली छिपकली’ म्हटले.

ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. डिस्को डान्सरच्या कार्यक्रमात तो अगदी मस्त शैलीत पोहोचला. ओरी आणि उर्फीने एकत्र खूप पोज दिल्या. या दोघांच्या इंस्टाग्राम व्हिडीओवर यूजर्सच्या मजेदार प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. एकाने लिहिले, ‘जोडी छान आहे, दोन कार्टून एकत्र.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले, ‘खरंच! दोघंही खूप छान जमतात, त्यांची जोडी मस्त आहे.’