“सलमानच्या सेटवर मुलींसाठी नियम असतात, अंगभर कपडे…” पलक तिवारीच्या वक्तव्याची चर्चा

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट 21 एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट असून प्रत्येकजण त्याचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अलीकडेच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने (Palak Tiwari) एका मुलाखतीत सलमान खानबद्दल असे वक्तव्य केले होते, ज्यानंतर आता तिला माफी मागावी लागली आहे.

काय म्हणाली पलक तिवारी?
पलकने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिले सलमान खानच्या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी सेटवर कसे वातावरण असते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने, ‘मी सलमान खानच्या अंतिम चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. फार कमी लोकांना माहिती असेल की सलमान खानच्या सेटवर मुलींसाठी काही नियम असतात. त्या रिविलिंग कपडे घालू शकत नाहीत. मुलींनी पूर्ण कपडे घालायचे. जेव्हा मी पहिल्यांदा शर्ट आणि जॉगर घालून (अंगभर कपडे घालून) सेटवर जायला निघाले तेव्हा माझ्या आईने मला कुठे चालली आहे? तू आज असे कपडे कसे घातलेस? असा प्रश्न विचारला होता.’

पुढे पलक म्हणाली, ‘सलमान नेहमी सांगतो तुम्हाला जसे कपडे घालायचे तसे घाला. पण मुलींनी नेहमी काळजी घ्यायला हवी असे देखील तो सांगतो. त्याच्या आसपास असणाऱ्या सर्वांनाच तो वैयक्तीदृष्ट्या ओळखत नाही. तसेच तेथील फार लोकांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न असतो की महिला सुरक्षित राहतील.’

पलक तिवारीने बदलले वक्तव्य
या वक्तव्यानंतर पलक तिवारीला खूप ट्रोल करण्यात आले. आता यावर स्पष्टीकरण देत पलक म्हणाली की, “खरोखर गैरसमज झाला आहे. मला एवढेच सांगायचे होते की मी स्वतःसाठी काही नियम बनवले आहेत की वरिष्ठांसमोर जाताना कसे कपडे घालायचे. मी सलमान सरांना बघून मोठा झालो आहे, मग मी काहीही घालून त्यांच्यासमोर कसं जाऊ शकतो,” असं ती म्हणाली आहे.