यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

लखनऊ :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर लखनऊमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. उत्तर प्रदेश सरकारने आपत्कालीन सेवांसाठी सुरू केलेला नंबर ‘डायल ११२’ वर संदेशाद्वारे ही धमकी देण्यात (Yogi Adityanath Receives Death Threat) आली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी मुख्यमंत्री योगी यांना लवकरच मारीन’, असे म्हटले आहे. धमकी मिळाल्यानंतर ‘११२’ च्या ऑपरेशन कमांडरने सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम ५०६, ५०७ आणि आयटी अॅक्ट ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.