“गुजरात दंगलीवर चित्रपट काढला तर कुत्रंही…”, केआरकेने ‘द काश्मीर फाइल्स’वर केलं वक्तव्य

मुंबई – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “द काश्मीर फाइल्स चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.५ कोटी कमावले आणि तो सुपरहिट ठरला. पण गुजरात दंगलीवर चित्रपट काढला तर कुत्रंही पाहायला जाणार नाही. हे आजच्या भारताचं सत्य आहे आणि मोदीजी २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान होतील हा याचा पुरावा आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही”, असे केआरके म्हणाला.

यानंतर केआरकेने आणखी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये तो म्हणाला, ‘काश्मीर फाइल्सचं यश हा पुरावा आहे की कोणत्याही खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाही. त्यांना उरी, काश्मीर फाइल्स चित्रपट करावे लागतील. टायगर आणि पठाण चित्रपट चालणार नाही.