प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू; मनोरंजन विश्व शोकसागरात 

Vaibhavi Upadhyay Dead : कॉमेडी शो साराभाई व्हर्सेस साराभाई फेम वैभवी उपाध्याय यांचे रस्ते अपघातात निधन झाले, त्यामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री  शोकसागरात बुडाली आहे. वैभवीच्या निधनाचे वृत्त समजताच अभिनेते सतीश शाह, रुपाली गांगुली आणि देवेन भोजानी यांनीही वैभवीला श्रद्धांजली वाहिली आहे.

देवेन भोजानी यांनी बुधवारी ट्विट केले होते, ‘धक्कादायक! साराभाई vs साराभाई मधील जास्मिन म्हणून प्रसिद्ध असलेली एक अतिशय चांगली अभिनेत्री आणि प्रिय मैत्रिण वैभवी उपाध्याय यांचे निधन झाले. रुपालीने वैभवीसाठी इंस्टाग्रामवर एक स्टोरीही पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवर वैभवीचा फोटो पोस्ट करत खूप लवकर निघून गेलीस असं रुपालीने लिहिले.

साराभाई vs साराभाई व्यतिरिक्त, वैभवी सीआयडी आणि अदालत सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तिने दीपिका पदुकोणसोबत 2020 मध्ये ‘छपाक’ चित्रपटातही काम केले होते आणि नसीरुद्दीन शाहसोबत ‘झिरो केएमएस’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती.