आयपीएल २०२३चा अंतिम सामना खेळून झाल्यानंतर निवृत्ती घेणार? एमएस धोनी म्हणाला…

IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज संघ गुजरात टायटन्ससमोर होता. CSK संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला आहे. यासह CSK हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 10 गडी गमावून 157 धावाच करू शकला.

या सामना विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला समालोचक हर्षा भोगले यांनी त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. यावर सीएसकेच्या कर्णधाराने दिलेल्या उत्तराकडे सर्वांचे कान लागले आहेत. धोनीने सांगितले की, त्याच्याकडे निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी आठ-नऊ महिने शिल्लक (MS Dhoni On Retirement) आहेत. अशा स्थितीत त्याला घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही.

सामना संपल्यानंतर धोनी काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, “आयपीएल ही इतकी मोठी स्पर्धा आहे की ती आणखी एक फायनल आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. पूर्वी आठ आघाडीचे संघ असायचे, आता 10 संघ खेळतात. मी असे म्हणणार नाही की हा आणखी एक अंतिम सामना आहे. आमच्या मेहनतीला दोन महिने लागले. सर्वांनी योगदान दिले आहे. होय, मधल्या फळीला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. गुजरात एक उत्कृष्ट संघ आहे आणि त्यांनी यापूर्वी अनेकदा आव्हानांचा चांगला पाठलाग केला आहे. त्यामुळेच नाणेफेकीच्या वेळी त्याला प्रथम फलंदाजी करण्याची संधी द्यावी, असे वाटले होते, पण नाणेफेक हरल्याने बरे झाले.”

पुढील वर्षी खेळणार का या प्रश्नावर धोनीचे उत्तर
निवृत्तीविषयी बोलताना धोनी म्हणाला, मला माहीत नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ ते नऊ महिने आहेत, कारण पुढील लिलाव एकतर या वर्षी डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये आहे. अशा स्थितीत आतापासूनच त्याची डोकेदुखी का घ्यायची. मी खेळलो किंवा नाही, मी नेहमीच सीएसकेसाठी उपलब्ध असेन. खेळाडू म्हणून असो किंवा बाहेरून (कर्मचारी) खेळाडूला मदत करत राहील.”