परदेश फिरायची आवड आहे, पण खिशात पैसे नाहीत? चिंता नको, ‘या’ देशात अगदी स्वस्तात करु शकता प्रवास

Travel Tips: तुम्ही तुमचा परदेश प्रवासाचा (Foreign Trip In Budget) बेत पुढे ढकलत आहात कारण तिथला खर्च तुम्हाला परवडार नाही? तर, तुमच्या योजनांमध्ये फक्त एक बदल करा. हा बदल असा आहे की जिथे तुम्ही कमीत कमी पैशात आरामात प्रवास करू शकता असा देश निवडा. असे अनेक देश आहेत जिथे रुपया म्हणजेच देशांतर्गत चलन खूप मजबूत आहे आणि त्यांचे चलन खूपच लहान आहे. अशा देशांची निवड करून तुम्ही परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण करू शकता आणि खर्च देखील खूप कमी असेल. असे कोणते देश आहेत ते पाहूया.

इंडोनेशिया (Indonesia) 
भारताचा एक रुपया म्हणजे इंडोनेशियाचे १८४.९७ रुपये. आता या फरकाने इंडोनेशियाच्या सहलीसाठी किती स्वस्त खर्च येईल हे तुम्ही समजू शकता. कमीत कमी खर्चात तुम्ही सुंदर देशाला भेट देऊ शकता.

व्हिएतनाम (Vietnam) 
व्हिएतनामचा २८८.०१ डोंग, म्हणजे भारताचा एक रुपया होईल. त्यामुळे भारतीयांना व्हिएतनामचा प्रवास करणे खूपच परवडू शकते, व्हिएतनामी पदार्थ, सुंदर ठिकाणे आणि नद्यांसह या देशाला भेट देणे खूप स्वस्त असू शकते.

कंबोडिया (Cambodia) 
भारताचा एक रुपया म्हणजे ४९.९९ कंबोडियन रियाल. हे ठिकाण प्राचीन अवशेष आणि अनेक राजवाडे पाहण्यासाठी अतिशय योग्य आहे आणि खर्च किती कमी असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

श्रीलंका (Sri Lanka) 
धर्माच्या दृष्टीकोनातून असो किंवा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून, भारतातील अनेक लोकांच्या प्रवासाच्या यादीत श्रीलंका अव्वल स्थानावर आहे. तुम्हीही श्रीलंकेला जाण्याचा विचार करत असाल तर बजेटची चिंता पूर्णपणे सोडून द्या. भारताचा १ रुपया हा श्रीलंकेच्या ३.८८ रुपयांच्या बरोबरीचा आहे.

नेपाळ (Nepal) 
नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर आणि हिमालयाच्या सुंदर दऱ्यांना भेट देणे खूप सोपे आहे. नेपाळ सहलीचे बजेट आखणे तितकेच सोपे आहे. कारण भारताचा एक रुपया नेपाळच्या १.६१ रुपयांच्या बरोबरीचा आहे.

पॅराग्वे (Paraguay) 
भारताचा एक रुपया दक्षिण अमेरिकेत स्थायिक झालेल्या पॅराग्वेच्या ८७.६८ पॅराग्वेयन ग्वारानीच्या बरोबरीचा आहे. मग उशीर कशाचा, बर्फाळ दऱ्यांनी वेढलेल्या सुंदर शहराचे दर्शन घेण्यासाठी सहज तयारी करा.

येथे वाचा आणखी बातम्या