Vasant More | मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?

Pune News | सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेले मनसेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला राम राम केला आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरू आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क करून प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले असल्याचे वसंत मोरे सांगत आहेत. मात्र वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी वरिष्ठ नेते जरी इच्छुक असले तरी शहरातील बहुतांश पक्षातील पदाधिकारी मात्र तितकेसे सकारात्मक नसल्याचं बोललं जात आहे.

बहुतांश वेळा नेते एखादा पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वीच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित करत असतात. त्यामुळे पक्षप्रवेश ठरल्यानंतर राजीनामा दिला जातो. मोरे (Vasant More) यांनी मात्र कोणत्याही पक्षाची पक्षप्रवेशासाठीची निश्चिती न घेताच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आणि आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही तास राहिले असताना पक्षप्रवेशासाठी चाचपणी करत आहेत.

वसंत मोरे यांनी गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष मोरेंनी लोकसभेची इच्छा पूर्ण करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मागील निवडणुकीमध्ये मोरे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते सध्या त्या ठिकाणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे इच्छुक आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांचं येणं त्यांना अडचणीचे ठरू शकतं तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघाचा विचार केला तर मागील निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले सचिन दोडके आणि विशाल तांबे यांच्याकडून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे मोरे यांच्या येण्याने विधानसभेच्या गणितांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करता पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे.

काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी वसंत मोरे (Vasant More)  यांची भेट घेऊन त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली असली तरी लोकसभेबाबत कोणतीही वाचता केली नाही. जोशी यांनी इच्छा प्रदर्शित केली असली तरी काँग्रेसमधील इतर गट मात्र मोरे यांच्या प्रवेशाबाबत तितकेचे सकारात्मक दिसत नाहीत. मोरे यांची खळखट्याकची विचारसरणी पक्ष धोरणांमध्ये बसत नसून भविष्यात वसंत मोरे यांचे खळखटाक पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात जाऊ शकते असं काँग्रेस मधील काही स्थानिक नेत्यांचे मत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा विचार केला. येथील स्थानिक नेत्यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत, तिथेही सकारात्मकता दिसत नाही. महायुतीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांना सोडून कोणत्याही नेत्यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाबाबत ऑफर दिल्याच्या समोर आलेले नाही. तसेच भाजपचे सध्याचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मित्रत्वाच्या नात्याने फोन केला असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितला आहे. तो संपर्क वगळता इतर कोणताही संपर्क भाजपाकडून वसंत मोरे यांना झाल्याचं पाहिला मिळाला. त्यामुळे अद्याप तरी वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाचं अधांतरीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याचा चंग बांधलेले वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे