Valentine Day | ही ठिकाणे तुमचा पहिला व्हॅलेंटाईन डे बनवतील खास! खर्चही येईल कमी

फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खूप खास असतो. याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे ही (Valentine Day) साजरा केला जातो. लव्हबर्ड्स या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 7 फेब्रुवारी, रोज डेपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो, ज्या दिवशी जोडपे त्यांच्या जोडीदारांना त्यांचे प्रेम व्यक्त करतात. काही लोक या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचाही विचार करतात.

जर तुम्हीही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या खास दिवशी लोक आपल्या पार्टनरसाठी खास गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हीही या दिवशी तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक ठिकाण (Romantic place) शोधत असाल तर आम्ही तुम्हाला कमी बजेटच्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

राजस्थान
जर तुम्ही रोमँटिक ठिकाण शोधत असाल तर राजस्थान हा उत्तम पर्याय आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही लेक सिटी उदयपूर, पिंक सिटी जयपूर, गोल्डन सिटी जैसलमेर येथे प्लॅन करू शकता. येथे तुम्ही 5,000 रुपयांमध्ये सहज ट्रिप प्लॅन करू शकता.

हिमाचल प्रदेश
जर तुमच्या जोडीदाराला शांत ठिकाणी फिरायला आवडत असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशला जाण्याचा विचार करू शकता. येथील सुंदर पर्वत, हवामान आणि बागा तुम्हाला भुरळ घालतील. तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तुम्ही शिमला, मनाली, डलहौसी आणि कांगडा सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

उत्तराखंड
जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर उत्तराखंड देखील भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहता येईल. येथील सुंदर हिरवे दृश्य तुमचे मन मोहून टाकेल. येथे तुम्ही नैनिताल, मसुरी, डेहराडून आणि लॅन्सडाउनला जाऊ शकता. तुम्ही तुमचा खास दिवस 5 ते 6000 रुपयांमध्ये सहज साजरा करू शकता.

याशिवाय जर तुम्हाला दक्षिणेकडे प्रवास करायचा असेल तर तुम्ही हैदराबाद, केरळ किंवा हम्पीला भेट देऊ शकता. येथील बजेट 10 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते परंतु ते पर्यटनासाठी योग्य आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी