अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया येत असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन मी त्यांना करतो, असे आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया