IPL 2023: मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डला केले रिलीज, पाहा इतर संघांचीही यादी

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल, IPL) सर्व फ्रँचायझी आगामी हंगामाच्या (IPL 2023) तयारीला लागल्या आहेत. आयपीएल फ्रँचायझींना त्यांच्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी देण्याची आज शेवटची तारिख आहे. त्याच अनुशंगाने बऱ्याचशा फ्रँचायझींनी खेळाडूंना रिलीज (संघाबाहेर) आणि रिटेन (संघात कायम ठेवले) केले आहे. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी देतील. तत्पूर्वी आतापर्यंत कोणत्या फ्रँचायझींनी कोणत्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि कोणाला रिटेन केले आहे, यावर एक नजर टाकू…

चेन्नई सुपर किंग्स
रिटेन खेळाडू – एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चाहर.
रिलीज केलेले खेळाडू- क्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, नारायण जगदीशन आणि मिचेल सेंटनर.

मुंबई इंडियन्स
रिटेन खेळाडू- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेनियल सैम्स, टिम डेविड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा.
रिलीज केलेले खेळाडू- फॅबियन ऍलन, कायरन पोलार्ड, टाइमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि ऋतिक शौकीन.

कोलकाता नाइट राइडर्स
रिटेन खेळाडू- श्रेयस अय्यर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरूण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, नितीश राणा, शेल्डन जैक्सन, रिंकू सिंह, उमेश यादव.
रिलीज केलेले खेळाडू- शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच.

राजस्थान रॉयल्स
रिटेन खेळाडू- संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, जिमी नीशम, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मैकॉय.
रिलीज केलेले खेळाडू- नवदीप सैनी, डेरिल मिचेल, रस्सी वैन डर डुसेन, कॉर्बिन बॉस.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रिटेन खेळाडू– फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, वानिंदु हसारंगा, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, रजत पाटीदार.
रिलीज केलेले खेळाडू – सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेविड विली, आकाश दीप, जेसन बेहरेनडॉर्फ.

दिल्ली कॅपिटल्स
रिटेन खेळाडू – रिषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श, सरफराज खान, एनरिक नॉर्किया, कुलदीप यादव.
रिलीज केलेले खेळाडू – शार्दुल ठाकुर, टिम सिफर्ट, केएस भरत, मनदीप सिंह, अश्विन हेब्बर.

गुजरात टायटन्स
रिटेन खेळाडू- हार्दिक पंड्या, डेविड मिलर, शुभमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, रहमानुल्लाह गुरबाज, राशिद खान, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया, मैथ्यू वेड.
रिलीज केलेले खेळाडू – विजय शंकर, गुरकीरत मान सिंह, जयंत यादव, प्रदीप सांगवान, नूर अहमद, साईं किशोर, वरुण आरोन.

सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स या फ्रँयाचझींनी अद्याप त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही.