सोबत फोटो आहे म्हणून दगडफेकीला प्रोत्साहन दिले असे होत नाही; जयंत पाटील यांची सारवासारव

Jayant Patil :- बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचारातील आरोपीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत की, पवार यांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, हि बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे.

सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी त्या आरोपीचे इतर नेत्यांसोबत असलेले फोटो या ट्विटमध्ये जोडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा