आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही; संजय राऊत यांचा दांडपट्टा सुरूच

Mumbai – स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना छेद देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने सुरु असल्याचे दिसून येत आहे. यातच काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शनिवारी (२४ जून) देशातले १५ हून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले. उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती (PDP leader Mehbooba Mufti)  यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून भाजपसह अनेकांनी टीका केली आहे.

दरम्यान, या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर हा हिंदूस्थानचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवलं आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यामुळे अशी सडकून टीका करताना जरा जपून करा.

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्यावर आम्ही अधिक चर्चा करू. कदाचित उद्धव ठाकरे आज यावर सविस्तर बोलतील. उगाच तोंडाच्या वाफा दवडू नको. तुचमंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप आहे.