भारताच्या डिजीटायझेनश निधी मध्ये गुगल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

Modi In USA : अमेरिकेच्या भेटीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगल मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अॅमेझॉन चे अँड्र्यू जेसी आणि बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड कलहून यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

भारताच्या डिजीटायझेनश निधी मध्ये गुगल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सुंदर पिचाई यांनी पंतप्रधानांना सांगितले.(Google will invest 10 billion dollars in India’s digitization fund) तसेच गुजरात मध्ये जीआयएफटी सिटी मध्ये गुगलच्या जागतिक वित्तीयतंत्रज्ञान कार्यचालन केंद्र सुरू करणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले. अॅमेझॉन चे सीईओ अँड्र्यू जॅसी यांनी भारतात 11 अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक केली असून नव्याने 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

दरम्यान, भारत आणि अमेरिका एकत्रितपणे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विश्वासाने काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्नेहभोजनावेळी ते बोलत होते.
भारत-अमेरिका संबंधांचं माधुर्य उभय देशांच्या लोकांमधील संबंधांनी वाढलेलं आहे, द्विपक्षीय व्यापारातील आव्हानं सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य केलं आहे आणि गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत उभय देशांनी अतिशय दीर्घ आणि सुंदर प्रवास केला असल्याचं मोदी यांनी नमूद केलं.