Harbhajan Singh | ‘आम्ही तुमच्या आई आणि बहिणींना…’, हरभजन सिंगने माजी पाकिस्तानी क्रिकेटरला फटकारले, कारण ठरला अर्शदीप सिंग

Harbhajan Singh | पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे गंभीर अडचणीत आला आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान अकमल पाकिस्तानी वाहिनी एआरवाय न्यूजवर तज्ञ म्हणून भाग घेत होता. त्यानंतर अर्शदीप सिंगला पाहिल्यानंतर त्याने शीख समुदायावर भाष्य केले. आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अकमलची कानउघडणी केली आहे.

अकमल काय म्हणाला?
या सामन्याच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हे षटक अर्शदीप सिंगला दिले.

अर्शदीप गोलंदाजीसाठी आला तेव्हा अकमल म्हणाला, “काहीही होऊ शकते. 12 वाजले आहेत. 12 वाजता कोणत्याही शीखला षटक द्यायला नको होती.” अकमलच्या या वक्तव्यावर पॅनेलवर उपस्थित असलेला आणखी एक व्यक्ती मोठ्याने हसला. पण सोशल मीडियावर अकमलला शिव्याशाप आणि शीख समुदायाची खिल्ली उडवल्याबद्दल फटकारले जात आहे.

हरभजनला राग आला
अकमलच्या या कमेंटवर भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगही संतापला आहे. त्याने अकमलला आरसा दाखवला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हरभजन सिंगने लिहिले, “लख दी लानत तेरे कामरान अकमल. तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्यावा. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले जेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले, वेळ नेहमीच 12 वाजलेली होती. लाज वाटायला हवी.. थोडी कृतज्ञता बाळग.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप