Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके

Shirur LokSabha 2024 | मागील पाच वर्षांत खासदार नसतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्यशासनाकडून मोठा निधी आणला. मात्र विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) लोकांनी निधीसाठी निवेदने दिली, परंतु त्यांनी काहीच कामे केली नाही, अशी टीका जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी अमोल कोल्हेंवर केली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके मैदानात उतरले आहेत. नुकतेच आढळराव पाटील हे जुन्नर तालुक्यात गावभेटींसाठी आले होते. यावेळी आमदार अतुल बेनकेंनी हे वक्तव्य केले.

अतुल बेनके म्हणाले, मागील पाच वर्षांत खासदार नसतानाही शिवाजीराव आढळराव पाटील (Shirur LokSabha 2024
) यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्यशासनाकडून मोठा निधी आणला. सर्वसामान्यांची अनेक कामे मार्गी लावली. मात्र विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना लोकांनी निधीसाठी निवेदने दिली, परंतु त्यांनी काहीच कामे केली नाही. अनेकांना नोकरीला लावतो अशी आश्वासने दिली, पण त्यांनी एकाही तरुणाला नोकरीला लावले नाही. त्यामुळे फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या सुखदुखात अडीअडचणीत धावून येणारे आढळराव पाटीलच आपल्याला खासदार म्हणून हवेत, असे आवाहन अतुल बेनके यांनी जुन्नरकरांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा