भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजने त्यांचा संघ जाहीर

IND vs WI: 12 जुलैपासून भारताविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी, क्रिकेट वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. डॉमिनिकाच्या मैदानावर होणाऱ्या या कसोटी सामन्यात क्रेग ब्रॅथवेट विंडीज संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. त्याचबरोबर 2021 नंतर अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉललाही संघात स्थान मिळाले आहे.(West Indies announced their squad for the first Test against India)

विश्वचषक पात्रता फेरीतील विंडीज संघातील जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांनाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय 2 अनकॅप्ड खेळाडू कर्क मॅकेन्झी आणि अॅलिक अथानाज यांनाही संघात स्थान मिळाले आहे, ज्यांनी अलीकडेच बांगलादेश दौर्‍यावर गेलेल्या अ संघासाठी चांगली कामगिरी केली होती. या दोन्ही खेळाडूंचे पहिल्या कसोटीत पदार्पण अपेक्षित आहे.

दरम्यान, बार्बाडोसमध्ये सराव पूर्ण करून विंडीज दौऱ्याच्या तयारीसाठी १० दिवस अगोदर पोहोचलेली टीम इंडिया आता पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी डॉमिनिकाला रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. वनडे मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे, तर टी-२० मालिकेतील पहिला सामना ३ ऑगस्टला होणार आहे. युवा डावखुरा खेळाडू यशस्वी जैस्वालचे टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण फिक्स असल्याचे मानले जात आहे.

वेस्ट इंडिजचा १३ सदस्यीय संघ

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उप-कर्णधार), अलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेमन रेफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

राखीव खेळाडू – टेविन इम्लेच आणि अकीम जॉर्डन.