Govt scheme :  शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजना नेमकी काय आहे ? 

योजनेचे स्वरुप

शेतकरी, शेतमजूर आणि विधवा महिलांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी  सामुहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी शुभमंगल सामुहिक विवाह योजना राबविण्यात येते.

लाभाचे स्वरुप

• शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे १० हजार एवढे अनुदान.
• सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा तद्नुषंगिक खर्च तसेच विवाह नोंदणी शुल्क यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी प्रती जोडप्यामागे २ हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान.
• अनुदान वधुच्या आई, आई ह्यात नसेल तर वडील, दोन्ही ह्यात नसेल तर वधूच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा.

योजनेच्या अटी व शर्ती

  • वधू महाराष्ट्रातील रहिवाशी असावी.
  • वराचे वय २१ व वधूचे वय १८ वर्ष असावे.
  • वधू वरांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी अनुदान अनुदेय, तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास पुर्नविवाहसाठी अनुदान अनुज्ञेय.
  • विवाह नोंदणी कार्यालयात  नोंदणीकृत केलेल्या विवाहासाठी अनुदान अनुज्ञेय.
  • वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा एक लाख असणारे कुटुंबातील मुली अनुदानास पात्र.
  • सामुहिक विवाह सोहळा आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आवश्यक
  • एका स्वयंसेवी संस्थेत किमान ५ व कमाल १०० जोडप्याचा विवाह संमारभ आयोजन करता येईल.
  • एका स्वयंसेवी संस्थेला वर्षात दोनच सामुहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील.
  • विवाह सोहळ्यात सहभाग घेतलेल्या जोडप्यांचे छायाचित्रण करणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.

अधिक माहितीसाठी संपर्क : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गुलमर्ग पार्क हौसिंग सोसायटी, ३ रा मजला १५ ऑगस्ट चौक, जाधव बेकरी शेजारी, सोमवार पेठ,पुणे-११