टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात मोहम्मद शमीची एन्ट्री, जसप्रीत बुमराहची घेणार जागा

उद्यापासून (१६ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ चे (T20 World Cup 2022) बिगूल वाजणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल झाला आहे. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा दुखापतीमुळे टी२० विश्वचषक खेळू शकणार नाही. अशात भारतीय क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीने त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची निवड केली आहे. शमी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून सराव सामन्यांपूर्वी ब्रिस्बेन येथे भारतीय संघासोबत जोडला जाईल.

मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना स्टँडबायमध्ये जागा देण्यात आली असून लवकरच ते दोघेही ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.