असे बनवा घरच्या घरी कवठाची जेली चॉकलेट

पुणे – प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की , आपल्या कुटुंबातील सर्वांच्या पोटामध्ये पौष्टिक अन्न जाव .त्यासाठी चटपटीत पदार्थ अनोख्या पद्धतीने सजवून द्यायला गृहिणी वेगवेगळे पदार्थ रोजच शिकत असतात . मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या जेलीज खायला आवडतातच . मग आज आपण एक असा पदार्थ पाहूयात जो लहान मुलं अगदी आवडीने खातील . आणि कौठा मधील पौष्टिक तत्व देखील त्यांना मिळतील . कवठा अत्यंत गुणकारी आहे . विविध आजारांवर त्याचा उपयोग होतो . कवठाच्या बी मध्ये अमृत आहे असे म्हटले जाते . म्हणूनच शिवरात्रीच्या उपवासाला कवठ लागते .

तर मग पाहूया कवठाची जेली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१ पिकलेला कवठ , साखर किंवा गूळ

कृती : कवठाची जेली बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले कवठ फोडून घ्या . त्यातील गर काढून घ्या . तो एका कढईत काढून घ्या आणि तो गॅसवर माध्यम आचेवर ठेवा आणि तो गर भिजला जाईल इतपत पाणी घालावे . गर सारखा हलवत राहावा . कौठामध्ये असणाऱ्या बिया आणि घर मोकळा होईपर्यंत ढवळत राहा .

नंतर हे सर्व गाळून घ्या आणि राहिलेल्या गरामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घाला आणि पुन्हा मिडीयम गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत हलवत रहा . त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार त्याला आकार देऊन जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवा . कवठ जेली चॉकलेट तयार आहे .