नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !

म्हापसा : गोव्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मुद्द्यावर लढवण्यात येत असलेल्या या निवडणुकीत कोरोना काळात केलेले काम हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. सत्ताधारी भाजपने कोरोना काळात काहीच काम केले नाही असा आरोप विरोधक करत आहेत अशाच प्रकारचा आरोप भाजपचे म्हापशातील विद्यमान आमदार जोशुआ डिसुझा यांच्यावर देखील करण्यात येत आहे.

मात्र जर गोव्याबरोबर म्हापशाचा विचार केला तर कोरोना काळात या मतदार संघात भरमसाठ काम झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथं नगरसेवकांच्या सहकार्याने एकजुटीने नागरिकांना आरोग्य मार्गदर्शन, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून औषध फवारणी, मास्क, सॅनिटाईझर, मोफत रुग्णवाहिका, कोविड रुग्ण आणि कुटुंबियांना मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, औषधांच्या कीट वाटप केले. म्हापशाच्या नागरिकांना लॉकडाउन काळात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, पोटनिवडणुकीत निवडणून आल्यानंतर स्थानिक आमदार जिशुआ डिसूझा यांच्यासमोर अनेक आव्हाने असताना कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे म्हापशेकर कौतुक करत आहेत.

जोशुआ हे सध्या घरोघरी जाऊन जनसंपर्क साधत असताना अनेक नागरिक हे कोरोना काळात केलेल्या कामामुळे त्याचं कौतुक करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात अनेक अडचणी आल्या मात्र रुग्णांची सेवा भाजप आणि जोशुआ यांनी केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कमी वय असताना देखील ज्या पद्धतीने जोशुआने या मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेतली ते पाहून आम्ही खरोखरच भारावून गेलो. आता निवडणुकीच्या काळात आम्ही जोशुआच्या पाठीशीच ठामपणे उभे राहू असे नागरिक सांगत आहेत.