‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या विकृती मागचा खरा सूत्रधार कोण ?’

पुणे : पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कर्नाटकमधील बंगळुरू येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ आज सकाळी ११.०० वाजता गोळीबार मैदान, पुणे कॅन्टोन्मेट ऑफिस जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व महा. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, “या विकृती मागचा खरा सूत्रधार कोण आहे? भाजपामध्ये मनुवादी विचारांची लोक आहेत. दोन समाजामध्ये व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे, भाजपाच्या कथनी आणि करणीमध्ये फार फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेला कर्नाटकचे मुख्यमंत्री क्षुल्लक म्हणून समाजकंटकांना पाठीशी घालतात. ही अत्यंत निंदनीय व दु:खद बाब आहे. या घटनेचा, या विकृतीचा व भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो.”

यावेळी काँग्रेस ज्येष्ठनेते उल्हास पवार यांचेही भाषण झाले. यावेळी बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, विनोद मथुरावाला, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, गोपाल तिवारी, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, राजेंद्र शिरसाट, अरुण वाघमारे, मंजूर शेख, संगीता पवार, मुख्तार शेख, सोनाली मारणे, विशाल मलके, प्रकाश पवार, सुनिल पंडित, अविनाश अडसूळ, राजू गायकवाड, चैतन्य पुरंदरे, विठ्ठल गायकवाड, प्रशांत सुरसे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, शोएब इनामदार, रमेश सोनकांबळे, प्रवीण करपे, सचिन आडेकर, सादिक कुरेशी, शाबीर खान, मीरा शिंदे, राजश्री अडसूळ, संजय कवडे, हेमंत राजभोज, चेतन आगरवाल, भगवान कडू, आसिफ शेख, व तसेच ब्लॉक व इतर सेलचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.