सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव, नेमकं कारण काय?

Sushma Andhare Vs Praveen Darekar : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा वाचाळपणा भोवणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. आता याच मुद्द्यावरून अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत.

धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसताना माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे. त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला आहे. धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत दरेकर यांनी मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. विशेष म्हणजे यावर अनेक आमदारांनी देखील आपली भूमिका सभागृहात मांडली.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले