Maharashtra Politics | विलिनीकरणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही ती निव्वळ अफवा? 

Maharashtra Politics –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे विलिनीकरणाच्या बाबतीत सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही ती निव्वळ अफवा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी (Naseem Siddiqui) यांनी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

नसीम सिद्दिकी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या संदर्भात प्रसरवण्यात आलेली बातमी ही पूर्णपणे खोटी आहे. खोट्या बातम्या पसरवणे हे भाजपाचे षडयंत्र (Maharashtra Politics) आहे, लोकांमध्ये शंका निर्माण करणे हा त्याचाच एक भाग आहे असे नसीम सिद्दिकी म्हटले.

पुढे नसीम सिद्दिकी म्हणाले की,  शरदचंद्र पवार यांची आजची पुण्यातील बैठक आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी पूर्वनियोजित होती. मंगलदास बांदल हे आमच्या पक्षाचे नाहीत. निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाच्या चिन्हाबद्दल दिलेल्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टाने कालच आमची याचिका स्वीकारली आहे. नसीम सिद्दिकी म्हणाले की, आयोगाने पक्षपात करून चिन्ह अजित पवार गटाला दिल आहे. त्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहोत. निवडणूक आयोगाला आम्ही वटवृक्ष, कप बशी आणि चष्मा या तीन चिन्हांचे पर्याय दिले आहेत असेही नसीम सिद्दिकी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole